Ramdas Athawale | आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो : रामदास आठवले

Ramdas Athawale | आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो : रामदास आठवले

| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 8:43 PM

आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु, असेही रामदास आठवले पुढे म्हणाले.

नागपूर : सीबीआय आणि ईडी छाप्यावर आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा टाकून छापा टाकतो, असे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी अडीच अडीच वर्षांचा विचार करावा. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहणार आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस राहणार. सेना भाजपात समन्वय करायला मी तयार आहे. पण यांना समन्वय करायचा नाही, तर मी काय करु? अनेक शिवसैनिक नाराज आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु, असेही रामदास आठवले पुढे म्हणाले.