बेलारुसकडून Russia ला अण्वस्त्र तैनात करण्याची मंजुरी – Russia Ukraine War

| Updated on: Feb 28, 2022 | 7:31 PM

रशिया आपली अण्वस्त्रे बेलारूसमध्ये आणू शकणार आहे. आता रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करू शकणार आहे. त्यामुळे युक्रेनवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून न्यूक्लियर डेटरंट फोर्सला देखील तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Follow us on

YouTube video player

Russia Ukraine War : गेल्या पाच दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraineयुद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान शेजारी राष्ट्र असलेल्या बेलारूसने (Belarusमोठा निर्णय घेतला आहे. बेलारूसने घटनात्मक सार्वमत घेऊन आपला अण्वस्त्र नसलेला दर्जा रद्द केला आहे. यामुळे आता रशियाचा मार्ग मोकळा झाला आहे. रशिया आपली अण्वस्त्रे बेलारूसमध्ये आणू शकणार आहे. आता रशिया बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करू शकणार आहे. त्यामुळे युक्रेनवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून न्यूक्लियर डेटरंट फोर्सला देखील तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अमेरिकेने याचा विरोध केला असून, असे कुठलेही पाऊल न उचण्याबाबत रशियाला इशारा दिला आहे. तसेच युरोपीयन संघाकडून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. आर्थिक निर्बंध लावण्यात आल्याने रशियाच्या चलनामध्ये डॉलरच्या तुलनेत 30 टक्क्यांची घट झाली आहे.