Sachin Tendulkar : बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर तेंडूलकर कुटूंब, राज ठाकरेंसोबत काढला फॅमिली फोटो अन्…
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच पत्नी आणि मुलासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट दिली
क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आपली उपस्थिती दर्शविली. निमित्त होतं गणेशोत्सव… सचिन तेंडूलकर आपल्या पत्नी आणि मुलासह राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून बाप्पा विराजमान झाले आहेत. या गणपती बाप्पाच्या दर्शनाला सचिन तेंडूलकर आपल्या पत्नी आणि मुलासह पोहोचले. राज ठाकरे यांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन तेंडूलकर कुटुबांनं घेतल्यानंतर राज ठाकरेंसोबत त्यांनी फोटो काढला. राज ठाकरेंसोबत काढलेल्या तेंडूलकर परिवाराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
Published on: Aug 28, 2025 11:35 AM
