Sambhajiraje LIVE | आरक्षणासाठी घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने वटहुकूम काढावा : संभाजीराजे

| Updated on: Jul 02, 2021 | 12:22 PM

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे एससीबीसी करण्याचा राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे. 

Follow us on

खासदार संभाजी छत्रपती आज पुण्याच्या वाघोलीत आले होते. आजपासून त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी आता दोनच पर्याय उरले आहेत. 102 वी घटनादुरुस्ती ही राज्याचे अधिकार अबाधित आहेत असं केंद्राने रिव्ह्यू पिटीशनमध्ये म्हटलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. त्यामुळे राज्याला काही पर्याय नाही. आता दुसरा मार्ग 318 ब च्या मार्गातून मागासवर्ग आयोग तयार करुन, गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करुन सर्व डाटा गोळा करावा लागेल. हा डाटा राज्यपालांच्याद्वारे राष्ट्रपतींना पाठवतील. मग राष्ट्रपती त्यांना वाटलं तर 342 अ नुसार केंद्रीय मागास आयोगाला पाठवू शकतात, मग ते राज्य मागास आयोगाला पाठवतील, मग राष्ट्रपतींना पटलं तर संसदेला देऊ शकतात, असं संभाजीराजे म्हणाले.