Sambhajinagar News : संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
Sanjay Shirsat Visit CIDCO Bus Stand : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज शहरातील सिडको बस स्थानकाची पाहाणी करत आढावा घेतला. अचानक पालकमंत्री पाहाणीसाठी आल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकाची पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पाहाणी केली आहे. यावेळी त्यांनी बस स्थानकातील सुरक्षेचा आढावा घेतला. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी ही भेट दिली.
पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानकाची आज पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अचानक भेट देऊन पाहाणी केली. या पाहणी दरम्यान शिरसाट संतापलेले बघायला मिळाले. संजय शिरसाट यांनी बस स्थानकाला अचानक भेट दिल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडलेली बघायला मिळाली. यावेळी बस स्थानक परिसरात असलेल्या अस्वच्छतेवरूनण शिरसाट यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. परिसरातील सिसिटीव्ही सुरू आहेत का? याबद्दल देखील त्यांनी विचरणा केली. तसंच या बद्दल आपण पोलीस आयुक्तनशी देखील बोलणार असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले.
