Sambhajiraje Exclusive | ठाकरे आणि मोदी सरकारला हाफ-हाफ सेंच्युरी मारावी लागेलः संभाजीराजे

Sambhajiraje Exclusive | ठाकरे आणि मोदी सरकारला हाफ-हाफ सेंच्युरी मारावी लागेलः संभाजीराजे

| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 2:39 PM

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पहिली हाफ सेंच्युरी ही राज्य सरकारला मारावी लागणार आहे, मगच आरक्षणाची सेंच्युरी केंद्र सरकार पूर्ण करेल, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पहिली हाफ सेंच्युरी ही राज्य सरकारला मारावी लागणार आहे, मगच आरक्षणाची सेंच्युरी केंद्र सरकार पूर्ण करेल, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. मराठा आरक्षणाचा लढा, पुढील रणनीती, ठाकरे आणि मोदी सरकारची भूमिका, याबाबत संभाजीराजेंनी टीव्ही 9 मराठीशी सविस्तर बातचीत केली.

अशोक चव्हाण यांच्या दिल्लीतील भेटी गाठींनी काही निष्पन्न होईल असे वाटते ?

या भेटीगाठीचे स्वागत आहे, पण कशा पद्धतीने आरक्षण मिळावे हा मार्ग जो त्यांनी पुढे आणलाय तो फुलप्रूफ नाही. त्यांचे म्हणणे 50 टक्केचा कॅब वाढवावा आणि आरक्षण केंद्र सरकारने द्यावे मग 2014 ला ESBC चा कायदा का पारित केला आपण ? 2018 ला SEBC चा कायदा का पारित केला ? 2014 ते 2021 ही वाट बघायची गरज नव्हती.