Ajit Pawar : संग्राम जगताप वाढवणार अजित पवारांची डोकेदुखी

Ajit Pawar : संग्राम जगताप वाढवणार अजित पवारांची डोकेदुखी

| Updated on: Jun 25, 2025 | 2:24 PM

Ajit Pawar NCP Dispute : अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोक्याचा ताप वाढला आहे.

अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोक्याचा ताप वाढला आहे. संग्राम जगताप यांची कृती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढवणारी ठरेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं पक्षाला परवडणारं नाही, संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अजितदादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांनी बैठकीला दांडी मारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संग्राम जगताप यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नियमित बैठकीला दांडी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा पुनरुच्चार करत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षातील काही आमदारांच्या वादग्रस्त कृतीमुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कृतीवरून आता पक्षांतर्गत नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. पक्षाच्या बैठकीला संग्राम जगताप गैरहजर होते. या गैरहजेरीबाबत अजित पवार यांनी थेट बैठकीत नाराजी व्यक्त केली.

Published on: Jun 25, 2025 02:24 PM