महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच… बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील…

महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच… बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील…

| Updated on: Aug 21, 2026 | 10:59 AM

संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शहांनी स्थापन केलेल्या नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीमुळे राज्यातील बँकिंग क्षेत्राला मोठा फटका बसेल, असा दावा राऊत यांनी केला. हा सहकार चळवळ मोडून काढण्याचा कट असून, यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट केल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या मते, अमित शहांनी नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन स्थापन केली आहे, जी खरंतर एक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे.

या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेकडो अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका ताब्यात घेण्याचा किंवा त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी ९ ऑगस्ट रोजी नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल २०२६ संसदेत मंजूर करून घेण्यात आले, असा दावा राऊत यांनी केला. सहकार चळवळीचे माहेरघर असलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही संबंधित घटकांशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली नाही, असे राऊत यांनी म्हटले.

राऊत यांच्या मते, गुजरातमधील माधवपुरा को-ऑपरेटिव्ह बँकेसारख्या घोटाळेग्रस्त बँकांचे गैरव्यवहार लपवण्यासाठी हा सगळा घाट घालण्यात आला आहे. अमित शहांनी महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग चळवळ मोडून काढण्याचा कट रचला असून, यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Published on: Aug 21, 2026 10:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us