Sanjay Raut Tweet : हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा, ठाकरे बंधु एकत्र दिसणार? राऊतांचं महत्वाचं ट्विट

Sanjay Raut Tweet : हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा, ठाकरे बंधु एकत्र दिसणार? राऊतांचं महत्वाचं ट्विट

| Updated on: Jun 27, 2025 | 10:01 AM

Sanjay Raut Tweet On United March : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधु एकत्रित मोर्चा काढणार असल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

हिंदी सक्ती विरोधात आता एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या मोर्चा संदर्भात संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंसोबत या मोर्चा संदर्भात चर्चा केली असल्याचं समजलं आहे. राज ठाकरेंनी कालच पत्रकार परिषदेत आपण सर्व राजकीय पक्षांशी बोलणार असल्याचं म्हंटलं होतं. त्यानंतर त्यांनी आता उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेनंतरच आता संजय राऊतांनी हे एकत्र मोर्चाच ट्विट केलं आहे. त्यामुळे या मोर्चात ठाकरे बंधु एकत्र बघायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हंटलं आहे की, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल. जय महाराष्ट्र. असं हे ट्विट आहे. यात राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो देखील शेअर केलेला आहे.

Published on: Jun 27, 2025 10:01 AM