जी माणसं महाराष्ट्र द्रोह करतील त्यांनी हीच भाषा

जी माणसं महाराष्ट्र द्रोह करतील त्यांनी हीच भाषा

| Updated on: Apr 18, 2022 | 11:33 PM

जी माणसं महाराष्ट्राबद्दल द्रोह करतील, दिल्लीत जाऊन कटकारस्थानं करतात, त्यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरायची नाही तर मग भाषा कशी वापरायची असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

जी माणसं महाराष्ट्राबद्दल द्रोह करतील, दिल्लीत जाऊन कटकारस्थानं करतात, त्यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरायची नाही तर मग भाषा कशी वापरायची असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. गेल्या पस्तीस वर्षापेक्षा जास्त काळ मी पत्रकारितेत आहे, सार्वजनिक जीवना काम करत आहे असताना, मी एकाद्याच माणसाबद्दल म्हणजे किरीट सोमय्यांबद्दलच का शिवराळ भाषा वापरतो, त्याचे चिंतन आम्ही नाही आमच्यावर टीका करणाऱ्यांनी करावं असंही मुलाखतीत सांगितले. शिवराळ भाषा मी वापरली आहे, आणि पुन्हा पुन्हा सांगतो आहे की, मी शिवराळ भाषा वापरली पण मी शब्द माघार घेतला नाही. राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केल्यानंतरही त्यांनीही एकदा स्वतः चिंतन करावे अशी टीका त्यांच्यावर करुन आता त्यांना आयुष्यभर चिंतनच करावे लागणार अशी टीकाही त्यांनी केली आहे.