Maharashtra Election 2026 : मराठी माणूस खडबडून जागा झालाय… संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधूंच्या वादळामुळे…
मुंबई महापालिका निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले असताना, संजय राऊत यांनी ही केवळ निवडणुकीपुरती लढाई नसून, मुंबई धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. 28 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना, राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवरही निशाणा साधला. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचा उल्लेख करत, त्यांनी मुंबईच्या राजकीय संघर्षावर प्रकाश टाकला.
संजय राऊत यांनी आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबईसह 28 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना, राऊत यांनी मुंबईतील निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित नसून, मुंबईच्या भवितव्याची मोठी लढाई असल्याचे म्हटले आहे. केंद्रामधील राक्षसी सत्ता आणि महाराष्ट्रातील मराठी द्रोही सत्ता काही धनदांडग्यांच्या मदतीने मुंबई पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राऊत यांच्या मते, महापालिका निवडणूक हे या मोठ्या लढाईतील पहिले आणि महत्त्वाचे पाऊल आहे. महापालिका जिंकल्यावरच पुढल्या लढाईला सुरुवात होईल. मुंबईच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या संघर्षाकडे देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले असल्याचे राऊत यांनी सांगितले. तर ठाकरे बंधूंच्या वादळामुळे मराठी माणूस खडबडून जागा झाला असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.
