100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 11:58 AM

देशात 100 कोटी जनतेचं लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सवाल केला आहे. 100 कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे.

मुंबई : देशात 100 कोटी जनतेचं लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र, त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सवाल केला आहे. 100 कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे. जगामध्ये आपला देश लसीकरणात 19 व्या स्थानावर आहे. या संदर्भात वेगवेगळे आकडे बाहेर येत असतात, असं टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे.

100 कोटी डोस खरोखरच पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे. जगामध्ये आपला देश लसीकरणात 19 व्या स्थानावर आहे. या संदर्भात वेगवेगळे आकडे बाहेर येत असतात. काही लोकं म्हणतात 33 कोटीच दोन डोस झाले आहे. काही लोक म्हणत आहेत आम्हाला दुसरा डोस मिळत नाहीये. पण शेवटी एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं म्हटलं. उत्सव करायचा म्हटलं तर या देशात नवीन प्रथा पायंडा पडला आहे. मोदींच्या उत्सवात सर्वांनी सामिल होऊ या. देशात सध्या इव्हेंट सुरू आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.

Published on: Oct 22, 2021 11:58 AM