Sanjay Raut | इराणने संकटकाळात भारताला मदत केली, संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut | इराणने संकटकाळात भारताला मदत केली, संजय राऊतांचं मोठं विधान

| Updated on: Mar 01, 2026 | 11:23 AM

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना त्यांच्या कुटुंबासह ठार मारण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर देशाच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना त्यांच्या कुटुंबासह ठार मारण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर देशाच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वीच इस्त्रायल दौऱ्यावरून परतले होते. अशा परिस्थितीत घडलेली ही घटना भारताच्या जागतिक धोरणाला धक्का देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच इराणमध्ये 40 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

इराण हा भारताचा जुना मित्रदेश असल्याचे सांगताना राऊत म्हणाले की, संकटकाळात इराणने भारताला मदत केली आहे. काश्मीर प्रश्नावरही इराणने खुलेपणाने भारताची बाजू घेतली होती. याशिवाय मैत्रीच्या नात्याने इराण भारताला अत्यंत स्वस्त दरात तेल पुरवत होता. इराणने भारताशी कायम मैत्रीपूर्ण संबंध जपले, असेही त्यांनी अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर इराण–इस्त्रायल युद्धाबाबत भारताने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Published on: Mar 01, 2026 11:23 AM
Follow Us