Sanjay Raut : ५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात – संजय राऊत
Sanjay Raut News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
या भूतलावर ५६ इंच छातीवाले अनेक नेते आहेत. एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात. आमच्या नेत्यांना सुद्धा असे अनेक फोन आणि दबाव आहे, पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होने का काम नरेंदर और देवेंदर का है, हमारा नहीं. हम लढने वाले लोग है, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेने माकडांची माणसे केली. त्या माकडांना सरदार सुद्धा आपणच बनवले आणि त्या सरदारांनी आमच्या पाठीत घाव घातले. इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही. कुणाच्या चरणाशी बसली नाही, असंही यावेळी राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हंटले की, ५९ वर्षांची शिवसेना आजही विचाराने तरुण आहे. डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचे वय मोजायचे नसते. शिवसेना ५९ वर्षांची झाली, हा देशातील राजकारणाचा चमत्कारच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितले होते, या देशात फक्त दोनच सेना राहतील, एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या. वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवतही खात नाही. आजकाल जे स्वतःला वाघ समजणारे लोक ते अमित शहा, मोदींचे गवत खात आहेत. आम्ही असे नाहीत, असा हल्लाबोल राऊत यांनी शिंदे गटावर केला.
