राहुल गांधी पुराव्यासहित बोलतात त्यामुळे..; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

राहुल गांधी पुराव्यासहित बोलतात त्यामुळे..; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

| Updated on: Aug 10, 2025 | 11:07 AM

राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर खासदार संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

राहुल गांधी यांनी जे घोटाळे काढले त्याला निर्वाचन आयोग म्हणत आहे तुम्ही एफिडीवेट द्या, राहुल गांधी पुराव्यासहित बोलत आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्या शहानिशा केली आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांना बोलताना म्हंटलं आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना राऊतांनी म्हंटलं, उद्या देशभरात दोन महत्त्वाचे आंदोलन आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे प्रत्येक जिल्हा स्तरावर हे जे सरकार आहे महायुतीचे त्यांचे जे भ्रष्टाचार आहे. हनी ट्रैप आणि अनेक घोटाळ्याचे सरकार आहे. अनेक वेळा राज्यपाल आणि विधी मंडळात आवाज उठवून यांचे दिल्लीचे बाप मोदी शाह ऐकायला तयार नाही. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन जागृती करणे हे आम्ही करणार आहोत. उद्धव ठाकरे स्वत: दादरमध्ये असणार आहे. उद्या दिल्लीत विरोधी खासदार लाँग मार्चने जाणार आहे. निवडणूक आयोग ज्याप्रमाणे घोटाळे करत आहे त्यावर हे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Published on: Aug 10, 2025 11:07 AM