Sanjay Raut UNCUT | सरकार एक नंबरचं डरपोक आहे, संजय राऊतांचा घणाघात
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असताना विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, ही अत्यंत चुकीची बाब आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अशी परिस्थिती असणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेता नसताना सभागृह चालवणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. त्यांनी केंद्र सरकारवरही टीका करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जिथे शक्य असेल तिथे विरोधी पक्षनेतेपद देणे टाळले जात आहे. तसेच राहुल गांधी यांच्याबाबतही राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नेमू नये म्हणून कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारला भीती आहे की विरोधी पक्षनेता ठामपणे मुद्दे मांडेल आणि सरकारला अडचणीत आणेल. त्यामुळेच हे पद रिक्त ठेवले जात आहे, असे राऊत म्हणाले. या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, ही जर त्यांची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला. लोकशाही पद्धतीने सत्तेत येऊनही विरोधी पक्षाला योग्य स्थान न देणे हे लोकशाहीला कलंक असल्याचे त्यांनी सांगितले.