राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; तामिळनाडू सत्ता संघर्षावरून संजय राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल

| Updated on: May 08, 2026 | 11:32 AM

तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची मागणी करत राज्यघटनेचा उल्लेख केला. “टीव्हीकेचे 108 आमदार निवडून आले आहेत. राज्यघटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला प्रथम सत्ता स्थापनेसाठी बोलावले जाते आणि त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागते,” असे संजय राऊत म्हणाले.

तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी टीव्हीके पक्षाला सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची मागणी करत राज्यघटनेचा उल्लेख केला. “टीव्हीकेचे 108 आमदार निवडून आले आहेत. राज्यघटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला प्रथम सत्ता स्थापनेसाठी बोलावले जाते आणि त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागते,” असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली. “त्या वेळी बहुमत पाहिले होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, “राजभवनात भाजपचे एजंट बसले आहेत. नाव लोकभवन असले तरी लोकांच्या भावनांची हत्या तिथे होते,” अशी जहरी टीकाही त्यांनी केली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्यावर निशाणा साधत “त्यांना संविधानाचे धडे दिले पाहिजेत,” असेही राऊत म्हणाले. दरम्यान, टीव्हीके पक्षाच्या यशावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “अवघ्या दोन वर्षांत टीव्हीकेने तामिळनाडूत मोठं यश मिळवत प्रस्थापित पक्षांना धक्का दिला आहे.” मात्र महाराष्ट्रात अशा प्रकारची राजकीय क्रांती का होत नाही, या प्रश्नावर बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली.
याशिवाय, पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगितले. “ज्या राज्यात भाजप सत्ता स्थापन करते, तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते,” असा टोला देखील त्यांनी लगावला.

 

 

Published on: May 08, 2026 11:32 AM
Follow Us