Manikrao Kokate : कुंकू, हळद लावलं…आरती केली, कोकाटे थेट शनीच्या चरणी; साडेसाती दूर होणार?

Manikrao Kokate : कुंकू, हळद लावलं…आरती केली, कोकाटे थेट शनीच्या चरणी; साडेसाती दूर होणार?

| Updated on: Jul 26, 2025 | 3:40 PM

ज्यांची विकेट जाणार त्यामध्ये वादग्रस्त मंत्र्यांवर टांगती तलवार आहे. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेतच कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. तर शिरसाटांचा नोटांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ समोर आल्याने सरकारवर टीका झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील काही मंत्री आपल्या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे चांगलेच अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळतंय. अशातच विरोधकांनी देखील अशा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. याच अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांनी आता आपलं मंत्रिपद कायम राहावं यासाठी शनिदेवाला साकडं घातल त्याच्या चरणाशी स्वतःला लीन केल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांनी शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा लावाला आहे. विधानपरिषदेत रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलंय. आपल्यामागे लागलेली साडेसाती दूर व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील शनीशिंगणापूर येथे जात शनिदेवाचं दर्शन घेतल्याचे दिसून आले होते.

Published on: Jul 26, 2025 01:06 PM