संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला; उज्वल निकम यांनी सुनावणीत झालेल्या घटनांची दिली माहिती
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजची सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणात आता पुढची सुनावणी ही 24 तारखेला होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजची सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणात आता पुढची सुनावणी ही 24 तारखेला होणार आहे. सुनावणी नंतर सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान झालेल्या घटनांची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.
यावेळी बोलताना उज्वल निकम म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणी सीआयडीचं काय म्हणण आहे, ते मागवलं आहे. ते येत्या 24 तारखेला न्यायालयासमोर मांडलं जाईल. आज न्यायालयासमोर या प्रकरणाचे कागदपत्र सादर करण्यात आले. त्यात संतोष देशमुख यांची प्रत्यक्ष हत्या होतानाचा व्हिडिओ आम्ही न्यायालयासमोर हजर केला आहे. तसंच या व्हिडिओला बाहेर कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळू नये, नसता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी विनंती आम्ही कोर्टाला केली आहे, असंही उज्वल निकम यांनी सांगितलं आहे. आरोपी वाल्मिक कराड याची चल आणि अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज देखील आम्ही न्यायालयात आज सादर केला असून त्यावर अद्याप कराडचा खुलासा आलेला नसल्याचं वकील निकम यांनी म्हंटलं आहे.
