Phaltan Doctor Death : खासदार ते बीड…डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 8 प्रश्नांचा बॉम्ब, दानवेंच्या भूमिकेनंतर सरकारपुढे पेच; पुढे काय होणार?
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर अंबादास दानवेंनी ट्वीट करत राजकीय दबावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी खासदारांचे पीए आणि पीआय यांच्या भूमिकेची चौकशी तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील एका फार्म हाऊसवरून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.
या प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, महिला डॉक्टरवर राजकीय दबाव होता. दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून विचारले की, महिला डॉक्टरचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण आणि ते खासदार महोदय नेमके कोण आहेत? राजकीय नेत्यांसह पीए आणि पीआयला बेड्या ठोकण्याची मागणी त्यांनी केली. ही आत्महत्या नसून मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला डॉक्टरचा बळी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Published on: Oct 25, 2025 05:24 PM
