Phaltan Doctor Death :  डॉक्टर महिलेच्या हातावरच्या सुसाईड नोटनंतर कठोर कारवाई, पोलीस अधीक्षकांकडून मोठी अपडेट समोर

Phaltan Doctor Death : डॉक्टर महिलेच्या हातावरच्या सुसाईड नोटनंतर कठोर कारवाई, पोलीस अधीक्षकांकडून मोठी अपडेट समोर

| Updated on: Oct 27, 2025 | 1:25 PM

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एक पोलीस उपनिरीक्षक आणि एका नागरिकाविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात भेट दिली. पोलीस उपनिरीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

साताऱ्याच्या फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे एक पोलीस उपनिरीक्षक आणि एका सिव्हिलियन व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळ, बलात्कार आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ही घटना फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये घडली असून, तिथेच डॉक्टरने आत्महत्या केली होती. या गुन्ह्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून पाच दिवसांत सर्वसमावेशक कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Published on: Oct 24, 2025 03:43 PM