मानवी साखळीच्या सहाय्याने कावडी चढवून मुंगी घाट सर, बघा थरारक ड्रोनची दृश्य

मानवी साखळीच्या सहाय्याने कावडी चढवून मुंगी घाट सर, बघा थरारक ड्रोनची दृश्य

Harshada Shinkar | Updated on: Apr 03, 2023 | 3:17 PM

VIDEO | लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

सातारा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. हे देवस्थान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणूनही ओळखले जाते .या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पारंपारिक पध्दतीने होतो. यात्रेचा आज मुख्य दिवस असून या गडावर मुंगी घाटातून हजारो कावडी गड चढून वर येतात. या येणाऱ्या कावडीमध्ये सासवड येथील तेल्याभुत्याची कावड ही मानाची असते.सगळ्यात शेवटी रात्री उशिरा गडावर पोहचते आणि त्याच्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. ही कावड हाताची मानवी साखळी करुन घाटातून वर चढवली जाते. साताऱ्यापासून पूर्वेकडे ९०किलोमीटर अंतरावर असणारे शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांच मोठ श्रद्धास्थान महाराष्ट्रा सोबत आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या स्वरुपात भाविक या यात्रेस हजेरी लावतात. हि यात्रा म्हणजे श्री. शंभु महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा उत्सवाचा हा कार्यक्रम असतो. बघा कावडी चढविण्याच्या या साहसी कार्यक्रमाची ड्रोन कॅमेरातून टिपलेली थरारक दृश्य..

Published on: Apr 03, 2023 3:16 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us