Nawab Malik | शाहरुख खान हा NCBचा पुढचा टार्गेट आहे – नवाब मलिक

Nawab Malik | शाहरुख खान हा NCBचा पुढचा टार्गेट आहे – नवाब मलिक

| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 3:10 PM

बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरु असून आता पुढचं टार्गेट शाहरुख खान आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. शाहरुख खानला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. शाहरुख खानला अडकवण्यात आलं, असं मलिक म्हणाले.

क्रूझ पार्टीवरील धाडसत्रावरुन थेट नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. “कुठल्या अधिकाऱ्याला कस्टममधून इथे बसवलं, कुणाच्या बोलण्यावरुन धाडी सुरु आहेत, लोकांमध्ये भीती निर्माण कोण करत आहेत, भाजपचे कोणते नेते मध्यस्थी करत आहेत, हे सगळे बाहेर काढणार” असं नवाब मलिक म्हणाले.

बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरु असून आता पुढचं टार्गेट शाहरुख खान आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. शाहरुख खानला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. शाहरुख खानला अडकवण्यात आलं, असं मलिक म्हणाले.