Shahaji Bapu Patil : काय झाडी, काय धाडी…शहाजीबापू पाटील नॉट ओक्के, कारवाईनंतर गहिवरले; म्हणाले हे बरोबर नाही…

Shahaji Bapu Patil : काय झाडी, काय धाडी…शहाजीबापू पाटील नॉट ओक्के, कारवाईनंतर गहिवरले; म्हणाले हे बरोबर नाही…

| Updated on: Dec 01, 2025 | 10:35 PM

शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर निवडणूक आयोगाने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "काय धाडी?" म्हणत पाटील भावूक झाले. स्वतःच्याच सरकारमध्ये अशी वागणूक का, असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला आहे, ज्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील तणाव समोर आला.

शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर निवडणूक आयोगाने धाड टाकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. वरिष्ठ नेत्यांनी ही नियमित कारवाई असल्याचे म्हटले असले तरी, शहाजी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “काय डोंगर, काय झाडी” म्हणत गुवाहाटीला गेलेले पाटील आता “काय धाडी!” म्हणत व्यथित झाले आहेत. भाजपसोबत सत्तेत असूनही आपल्यावर आणि कार्यकर्त्यांवर कारवाई होत असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण भाजपसाठी अनेक कष्ट केले असतानाही अशी वागणूक मिळत असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. सांगोल्यात स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आघाडी-प्रतिआघाडीचे राजकारण या धाडीमागे असल्याचे म्हटले जाते. या घटनेमुळे शिंदे गट आणि भाजपमधील संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Published on: Dec 01, 2025 10:35 PM