Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवार भडकले

| Updated on: Feb 04, 2026 | 11:05 AM

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत सध्या मोठी राजकीय चर्चा सुरू आहे. दिवंगत अजितदादा पवार यांना हे विलीनीकरण मान्य देखील होते आणि 12 फेब्रुवारी रोजी तशी घोषणा होणार होती, अशा चर्चा देखील होत आहेत. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाकडून अशा कोणत्याही विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्या नसून हा निर्णय केवळ महापालिका निवडणुकीपुरताच मर्यादित होता, असे सांगण्यात येत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत सध्या मोठी राजकीय चर्चा सुरू आहे. दिवंगत अजितदादा पवार यांना हे विलीनीकरण मान्य देखील होते आणि 12 फेब्रुवारी रोजी तशी घोषणा होणार होती, अशा चर्चा देखील होत आहेत. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाकडून अशा कोणत्याही विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्या नसून हा निर्णय केवळ महापालिका निवडणुकीपुरताच मर्यादित होता, असे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असती तर मित्र पक्ष म्हणून अजितदादांनी आम्हाला नक्कीच माहिती दिली असती, असे वक्तव्य केले होते. या संपूर्ण प्रकरणावर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं की, अजितदादा यांच्या राष्ट्रवादीशी विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि 12 फेब्रुवारी रोजी घोषणा होणार होती. तसेच या चर्चेत देवेंद्र फडणवीस सहभागी नव्हते. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू होती, असे नमूद करत शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चा प्रत्यक्षात झाल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

Published on: Feb 04, 2026 11:05 AM
Follow Us