Sharad Pawar : देशात 55 टक्के लोक हिंदी भाषिक, भाषेला कमी लेखणं बरोबर नाही; शरद पवारांचं वक्तव्य

Sharad Pawar : देशात 55 टक्के लोक हिंदी भाषिक, भाषेला कमी लेखणं बरोबर नाही; शरद पवारांचं वक्तव्य

| Updated on: Jun 24, 2025 | 2:32 PM

Sharad Pawar On Hindi Impose : नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात राजकारण तापलेलं असतानाच शरद पवार यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदी भाषा पहिली ते पाचवीपर्यंत सक्तीची करणं योग्य नाहीच. पण हिंदी भाषेला कमी लेखणं देखील बरोबर नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं आहे. देशात 55 टक्के जनता हिंदी भाषिक आहे. त्यामुळे व्यवहार करता आला पाहिजे, असंही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात राजकारण पेटलेलं आहे. विरोधकांकडून महायुतीवर टीका केली जात असतानाच आता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्ती करणे हे योग्य नाही असं त्यांनी म्हंटलं आहे. पण या भाषेला कमी लेखणं बरोबर नाही आहे. कारण देशात 55 टक्के लोक हे हिंदी भाषा बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करता येणं गरजेच आहे. हिंदी भाषेला महत्व देणं गरजेचं आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Jun 24, 2025 02:32 PM