Sunil Tatkare | शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया

Sunil Tatkare | शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया

| Updated on: Feb 13, 2026 | 5:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या लेखात शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत मोठा दावा केला आहे. विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचा विचार होता, मात्र ते स्वप्न अपूर्ण राहिले, असे त्यांनी नमूद केले आहे. आता अजितदादांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही त्यांनी लेखात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या लेखात शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत मोठा दावा केला आहे. विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचा विचार होता, मात्र ते स्वप्न अपूर्ण राहिले, असे त्यांनी नमूद केले आहे. आता अजितदादांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही त्यांनी लेखात म्हटले आहे. तसेच, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करावा लागला, असा दावा करत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असेही शिंदे यांनी लिहिले आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या या लेखावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा लेख “अत्यंत चुकीचा आणि गैरलागू” असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे लिखाण टाळावे, अशी विनंतीही त्यांनी केली. पुढे अशा आरोपांची पुनरावृत्ती झाल्यास योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही तटकरेंनी दिला आहे.

Published on: Feb 13, 2026 05:42 PM