‘एक दिवस आड करून जरी सभा घेतल्या तरी…’; शिंदे गटाच्या आमदाराचं उद्धव ठाकरे यांना आव्हान

‘एक दिवस आड करून जरी सभा घेतल्या तरी…’; शिंदे गटाच्या आमदाराचं उद्धव ठाकरे यांना आव्हान

aslam shanedivan | Updated on: Aug 27, 2023 | 1:32 PM

उद्धव ठाकरे यांची शिंदे गटाचे नेते आमदार संतोष बांगर यांच्या मतदार संघात आज जाहीर सभा होणार आहे. तर सत्तासंघर्षानंतर ही हिंगोलीत पहिली सभा होणार आहे. मात्र त्याच्याआधीच बांगर यांनी ठाकरे यांच्यावर टीका केलीय.

हिंगोली : 27 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत जाहीर सभा होणार आहे. ठाकरे यांची ही सभा सत्तासंघर्षानंतर पहिल्यांच होत असल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले असून ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागलेली आहे. मात्र याच्या आधी शिंदे गटाचे नेते आमदार आमदार संतोष बांगर यांनी थेट ठाकरे यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे.

बांगर यांनी ठाकरे यांच्या सभेवरून टीका करताना, हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक ही सभा घेतली जात आहे असा आरोप केला आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, येथे श्रावण मास निमित्ताने हिंदुत्ववादी विचारांची कावड यात्रा निघतेय. जी गेल्या अनेक वर्षापासून निघते. हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे. पण ही सभा म्हणजे फक्त काहीतरी खुसपूट टाकण्याचं काम आहे.

पण कितीही केलं तरी शिवसेनेची ताकद,हिंदुत्वाचा बुलंद आवाज हा कोणाच्या सोबत आहे हे सभा झाल्यानंतर कावड यात्रेत दिसेलच. तर एक सभा घ्या किंवा एक दिवस आड करून घ्या मात्र येथे कोणताही फरक पडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 27, 2023 1:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us