अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. अजितदादांप्रमाणेच शिंदेचाही घातपात...
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक नेत्यांनी पंढरपूरमध्ये येऊन रोहित पवार यांची भेट घेतली आहे, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पंढरपूरमध्ये रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी भेट दिली आहे, त्यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदे साहेबांचा घात होऊ शकतो, असं खळबळजनक वक्तव्य मगर यांनी केलं आहे. मी सरकारमधला आहे, पण अजितदादांसोबत काय झाले ते सगळ्यांना माहिती आहे. मी शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आणि माळशिरस तालुका पंचायत समिती सभापती आहे.
