शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका

शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका

| Updated on: Aug 20, 2026 | 10:04 PM

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणीदरम्यान उबाठा गटाच्या युक्तिवादावर शिंदे गटाने जोरदार टीका केली. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि यापूर्वीच्या न्यायालयीन निकालांवर उबाठाचा विश्वास नसल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत करण्यात आलेल्या बदलांचा मुद्दाही शिंदे गटाने उपस्थित केला. ही घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती का, याचे स्पष्ट उत्तर उबाठाकडून […]

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणीदरम्यान उबाठा गटाच्या युक्तिवादावर शिंदे गटाने जोरदार टीका केली. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि यापूर्वीच्या न्यायालयीन निकालांवर उबाठाचा विश्वास नसल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला.

2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत करण्यात आलेल्या बदलांचा मुद्दाही शिंदे गटाने उपस्थित केला. ही घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती का, याचे स्पष्ट उत्तर उबाठाकडून दिले जात नसल्याचा दावा करण्यात आला. तसेच पक्षातील कथित ‘हुकूमशाही’चा मुद्दा पक्षांतर्गत मांडण्याची मुभाच नव्हती, असा युक्तिवाद उबाठाच्या वकिलांनी केल्यावर शिंदे गटाने त्यावरही प्रश्न उपस्थित केला.

याशिवाय, युतीमध्ये निवडणूक लढताना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवर पक्षाची मालकी ठरवता येणार नाही, असा उबाठाचा युक्तिवाद असल्याचे सांगण्यात आले. मात्र शिंदे गटाने त्यांच्या आमदारांसोबत संघटनात्मक ताकद असल्याचा दावा केला. केवळ पक्षचिन्हामुळे निवडणूक जिंकता येत नाही, तर जनतेत काम करावे लागते, असा टोलाही शिंदे गटाने उबाठाला लगावला.

Published on: Aug 20, 2026 10:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us