Nilesh Rane : निलेश राणे रात्री 12 वाजता पोलीस ठाण्यात, भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड अन्… ‘त्या’ गंभीर आरोपानं खळबळ

| Updated on: Dec 02, 2025 | 10:23 AM

मालवण येथे मध्यरात्री भाजप देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर यांच्या नंबरप्लेट नसलेल्या गाडीत दीड लाखांची रोकड आणि दारू आढळल्याने खळबळ उडाली. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी पोलीस ठाण्यात धडक देत भाजपवर निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप केला. पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई न केल्याने राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

मालवणमध्ये भाजप नेत्याच्या गाडीत रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी मध्यरात्री मालवण पोलीस ठाण्यात धडक देत भाजपच्या देवगड तालुका अध्यक्षावर गंभीर आरोप केले आहेत. पिंपळपार येथे तपासणीदरम्यान एका कारमध्ये दीड लाख रुपये रोख आणि दारू आढळून आली. ही गाडी भाजप देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर यांची असल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीला नंबरप्लेट नव्हती, तसेच प्रचाराची वेळ संपल्यानंतरही त्यात भाजपचा स्कार्फ आढळला. पोलिसांनी ही गाडी पकडल्यानंतर ती सोडून देण्याबाबत चर्चा सुरू होती, असा दावा निलेश राणे यांनी केला. माहिती मिळताच राणे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली. एफआयआर दाखल करण्यास उशीर होत असल्याबद्दल त्यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक काळात पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप करत राणे यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Published on: Dec 02, 2025 10:23 AM