आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; ‘पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही’
पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंवरती हल्लाबोल केलाय. चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय. ‘आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, दरोडेखोर असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न […]
पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंवरती हल्लाबोल केलाय. चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय. ‘आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, दरोडेखोर असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही. संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे त्याच्यात देखील हे दिलेलं आहे स्पष्टपणे की जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात पण पक्षाचं चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही. राजकारणामध्ये आपली जी काही पद्धत आहे, त्याच्यात कुठेही संविधान आपल्याला सूट चोरी करण्यासाठी देत नाही आणि म्हणून चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये.’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
