Raigad News : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सज्ज; शिवप्रेमींची गर्दी

Raigad News : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सज्ज; शिवप्रेमींची गर्दी

| Updated on: Jun 06, 2025 | 9:02 AM

352nd Shivrajyabhishek ceremony : छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडणार आहे. त्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड सज्ज झालेलं आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

आज  छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. राज्यभरातून लाखो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रायगडावर गर्दी केली आहे. गड पूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी 9.30 वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन होणार आहे. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले असून गड पूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. होळीच्या माळावर शिवकालीन मर्दानी आणि युद्ध कलेची युवक युवतींनी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

Published on: Jun 06, 2025 09:01 AM