Sanjay Raut | राज्यपाल राज्याचे पालक, त्यांनी राज्याची बदनामी करु नये : संजय राऊत

| Updated on: Sep 21, 2021 | 8:40 PM

भाजपचे लोक विरोधी पक्षात आहेत. ते सरकारवर चिखल फेकत आहेत. राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. त्यांच्या डोक्यावरची टोपी ही विद्वत्तेची आहे. त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजे. पण ते त्यांना उत्तेजन देत आहेत’, असं संजय राऊत म्हणाले.

Follow us on

YouTube video player

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा पत्रसंघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन बोलावलं होतं. त्याला उत्तर देताना संसदेचं 4 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केलीय. या पत्रसंघर्षानंतर आता राज्यातील भाजप आणि शिवसेनेचे नेते आमनेसामने आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोला लगावला आहे. ‘अशा प्रकारचं पत्र लिहून ते मीडियाकडे लीक करण्याची गरज नाही. विशेष अधिवेशन कशासाठी? असं काय घडलं आहे महाराष्ट्रात? राज्यापाल हे राज्याचे पालक आहेत. त्यांनी राज्याची बदनामी करु नये. घटनात्मक पदावर ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते या राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. राज्याची बदनामी होत असेल तर त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे. भाजपचे लोक विरोधी पक्षात आहेत. ते सरकारवर चिखल फेकत आहेत. राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. त्यांच्या डोक्यावरची टोपी ही विद्वत्तेची आहे. त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजे. पण ते त्यांना उत्तेजन देत आहेत’, असं संजय राऊत म्हणाले.