Ashok Harnawal Video : ‘माझ्याकडे पूर्ण कुंडली, साहेबांवर काही बोलाल तर…’, माजी नगरसेवकाच्या डोळ्यात पाणी, ठाकरेंवर टीका करणाऱ्या गोऱ्हेंना टोकाचा इशारा

Ashok Harnawal Video : ‘माझ्याकडे पूर्ण कुंडली, साहेबांवर काही बोलाल तर…’, माजी नगरसेवकाच्या डोळ्यात पाणी, ठाकरेंवर टीका करणाऱ्या गोऱ्हेंना टोकाचा इशारा

| Updated on: Feb 24, 2025 | 12:41 PM

ठाकरे गटात असणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले, असा आरोपही संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केला. यासंदर्भात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांना विचारणा केली असताना त्यांनी नीलम गोऱ्हे यांना थेट इशारच दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले. दरम्यान, ठाकरे गटात असणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले, असा आरोपही संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केला. यासंदर्भात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांना विचारणा केली असताना त्यांनी नीलम गोऱ्हे यांना थेट इशारच दिला आहे. ‘मी सामान्य शिवसैनिक आहे. रिक्षावाल्यापासून ते नगरसेवक असं पद मी भूषवलं आहे. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण असा माझा पिंड आहे. मला आर्थिक धोरणाशी घेणं देणं नाही. पैशाच्या मोहापायी पक्ष बदलले जातात. नीलम गोऱ्हे काय आहेत हे तुम्ही समजून जा.. पण आज त्यांना माझं सांगणं आहे, कृपया उद्धव ठाकरेसाहेबांबद्दल काय बोलू नका’, अशी विनंतीच अशोक हरनावळ यांनी गोऱ्हेंना केली. पुढे ते असेही म्हणाले, ‘माझ्या कार्यकिर्दीत माझ्याकडे चार संपर्क नेते होते, त्यात नीलम गोऱ्हे, गजानन किर्तीकर, उदय सामंत, अमोल कोल्हे होते. यात दोनच लोकांची नावं मी घेऊ शकतो त्यात नीलम गोऱ्हे आणि गजानन किर्तीकर यांनी जे काही केलं ते समजून घ्या…’, असं सूचकपणे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर काही बोलाल तर माझ्याकडे कुंडली आहे ते मी पुराव्यानिशी काढेल, असा इशाराच अशोक हरनावळ यांनी दिला.

Published on: Feb 24, 2025 12:41 PM