Sushma Andhare : गुळाचा गणपती असा योगेश कदमांचा उल्लेख करत रामदास कदमांना अंधारेंचं थेट चॅलेंज, हिंमत असेल तर…
योगेश कदमांना आदेश देणाऱ्यांचे नाव जाहीर करावे, असं सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांना आव्हान दिले. अंधारे म्हणाल्या की, योगेश कदम हे फक्त नावाला गृहराज्यमंत्री होते आणि त्यांना कोणीतरी बाहुल्याप्रमाणे वापरले. त्यांनी शिफारस करणाऱ्यांचे नाव स्पष्ट करण्याची मागणी केली.
शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदमांना थेट आव्हान दिले आहे. योगेश कदमांना आदेश देणाऱ्यांचे नाव जाहीर करण्याची हिंमत दाखवावी, अशी मागणी अंधारे यांनी केली. योगेश कदम हे गृहराज्यमंत्री केवळ नावाला होते, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे. खरे पाहता, त्यांना एक मुका बाहुला म्हणून त्या पदावर बसवण्यात आले होते, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.
योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती आणि कोणी आदेश दिले होते, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. रामदास कदमांनी याबाबत स्पष्ट बोलावे, अशी त्यांची मागणी आहे. जर गृहराज्यमंत्र्यांना अन्य कोणी व्यक्ती आदेश देत असेल, तर याचा अर्थ तुमचा मुलगा योगेश कदम हा केवळ गुळाचा गणपती म्हणून नेमला होता का, असा परखड सवाल अंधारे यांनी विचारला आहे. आदेश देणाऱ्यांचे नाव घेण्याची रामदास कदमांची आजही हिंमत नसल्यास, त्यांना राजकीय संरक्षण नाहीये का, अशी शंकाही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.
