Vinayak Raut | दानवेंची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी; विनायक राऊतांची मागणी

Vinayak Raut | दानवेंची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी; विनायक राऊतांची मागणी

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 9:08 PM

दानवे यांची बुद्धी नेहमीच भ्रष्ट झालेली असते त्याची दखल नरेंद्र मोदी यांनी घ्यावी प्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हणणे म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केले.

रत्नागिरी : रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना करताना रावसाहेब दानवे यांनी खालच्या दर्जाची भाषा वापरल्याने पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलय. भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केले आणि या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते राजकीय नेत्याला सांड म्हणणे म्हणजेच दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय. दानवे यांची बुद्धी नेहमीच भ्रष्ट झालेली असते त्याची दखल नरेंद्र मोदी यांनी घ्यावी प्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हणणे म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केले.