Pune Video : चाक निघालं तरी नशेत कार पळवली अन् पोलिसांनी ती नाही पाहिली? बघा भररस्त्यातील थरार
दारूच्या नशेत कारचं चाक निघाल्यावरही गाडी चालवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात पाहायला मिळत आहे. आजुबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत दारूच्या नशेतील चालकाला पोलिसाच्या हवाले केलं आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरात बेधुंद गाडीचालकचा थरार पाहायला मिळाला. गाडी चालवत असताना गाडीच टायर निखळलेलं असताना भरधाव वेगात गाडी चालवत जीवाशी खेळ सुरू असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. धाडसी युवक सत्यजित सरवदे यांनी गाडीचा पाठलाग करत वाहतूक पोलिसाला याची माहिती देऊन ही गाडी थांबवली आणि लोकांचे जीव वाचवले. पुण्यात नाका बंदी सुरू असताना सर्व प्रकार घडला. सदर व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगरपासून ते रेल्वे स्टेशन पर्यंत हा मद्यधुंद चालक ही गाडी चालवत होता. या चालकाच्या हाताला पार्टीचा पार्टी बँड दिसत असल्याची माहिती मिळतेय. बंडगार्डन पोलिसांची नाकेबंदी सुरू असताना अति वेगाने कोरेगाव पार्क परिसरातून ही गाडी धावत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Published on: Dec 04, 2025 12:46 PM
