Solapur Crime : पतीसह तिघांकडून लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण, विवाहितेचं केलं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर

Solapur Crime : पतीसह तिघांकडून लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण, विवाहितेचं केलं मुंडन अन् भुवयांवर फिरवला ट्रीमर

| Updated on: Apr 03, 2025 | 12:46 PM

बार्शी येथे पतीसह तिघांकडून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेमकं काय घडलं बघा?

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीसह तिघांकडून विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. सोलापूर मधील बार्शी येथील संतापजनक ही घटना आहे. पती, मेहुणा आणि नणंदेकडून या विवाहितेला जबर मारहाण करत जबरदस्तीने मुंडन केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने बार्शीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीने रागाच्या भरात पीडितेच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवत चेहरा विद्रुप केला आणि जबरदस्तीने मुंडण करण्यास भाग पाडले. पीडितेच्या बहिणीच्या नवऱ्याचे आणि नणंदेचे अनैतिक संबध होते. अनैतिक संबंधाची माहिती पीडितेने पतीला सांगितल्याने  पीडित विवाहित महिलेला मारहाण करण्यात आली. नणंद आणि मेहुण्याचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला दिल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे फिर्यादित म्हटले असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Apr 03, 2025 12:46 PM