मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर

| Updated on: Nov 22, 2026 | 12:08 PM

सोलापूर जिल्ह्यातील माढामधील ऊसदराची कोंडी अखेर स्वाभिमानी संघटनेच्या आक्रमकतेमुळे फुटली आहे. पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने प्रतिटन ३४५० रुपये ऊस दर जाहीर केला. या घोषणेनंतर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये ऊस दरावरून सुरू असलेला तिढा अखेर संपुष्टात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ऊसाला प्रतिटन ३४५० रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबला असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दराच्या मागणीसाठी पिंपळनेरमधील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बंद पाडला होता.

संघटनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर साखर कारखान्याच्या प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन ऊस दर जाहीर केला. कारखान्याने 3450 रुपये प्रतिटन दर देण्याचे मान्य करताच, स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांनी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण केली आणि आपला आनंद व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी स्वाभिमानी संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनाला यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. माढा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Published on: Nov 22, 2026 12:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us