Nagpur | रेशन कार्डवरून अजूनही काही नागरिकांना रेशन धान्य मिळत नाही, Pravin Datke यांचा आरोप

Nagpur | रेशन कार्डवरून अजूनही काही नागरिकांना रेशन धान्य मिळत नाही, Pravin Datke यांचा आरोप

| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 3:23 PM

शहरात इ सेवा केंद्र वाढवावे , रेशनकार्ड वरून काही नागरिकांना अजूनही रक्षण मिळत नाही त्यांना त्वरित राशन सुरू करावे आणि निराधार नागरिकांनच मानधन त्यांना देण्यात यावं, या मागणीसाठी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर रस्त्यावर उतरून गरिबांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला.

शहरात इ सेवा केंद्र वाढवावे , रेशनकार्ड वरून काही नागरिकांना अजूनही रक्षण मिळत नाही त्यांना त्वरित राशन सुरू करावे आणि निराधार नागरिकांनच मानधन त्यांना देण्यात यावं, या मागणीसाठी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर रस्त्यावर उतरून गरिबांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. नागपुरातील भाजप आमदार प्रवीण दटके , मोहन मते आणि विकास कुंभारे या तीन आमदारांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं यावेळी काही नागरिक सुद्धा उपस्थित होते. शहरात फार कमी ठिकाणी इ सेवा केंद्र आहेत त्यामुळे कोरोना काळात सुद्धा वेगवेगळ्या सर्टिफिकेटसाठी या ठिकाणी गर्दी होते, त्यात वाढ करण्याला महापालिकेने परवानगी दिली मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात त्याची प्रक्रिया थांबली आहे. ती पूर्ण करवून यावर निर्णय घ्यावा, अनेक नागरिकांचे राशन कार्ड एन पी ए करण्यात आले, त्यामुळे त्यांना राशन मिळत नाही ते सुरू करावे, आणि निराधार नागरिकांना त्यांचं मानधन वेळेत द्यावं. या सगळ्या मागण्या आहे त्या मागण्या मान्य झाल्या नाहींतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला.