Special Report | शिंदेंचा दे धक्का, बुलेट ट्रेन सुसाट धावणार ! -tv9

| Updated on: Jul 14, 2022 | 10:29 PM

थेट जनतेतून नगराध्यक्ष, संरपंच निवडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.

Follow us on

शिंदे-फडणवीस सरकारनं, राज्याच्या जनतेला पहिला दिलासा दिलाय. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतलाय..पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे. दरात कपात झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 111 रुपयांवरुन 106 रुपये प्रतिलिटर होईल. तर डिझेल 97.रुपये 28 पैशांवरुन 94 रुपये 28 पैसे प्रति लिटर होईल. त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडेल.  पेट्रोल, डिझेलमध्ये नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच, शिंदे-फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झटका दिलाय. कारण ठाकरे सरकारचे निर्णय शिंदेंनी बदललेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष, संरपंच निवडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.