Special Report | 6 गुप्त भेटी आणि आघाडीत संशयकल्लोळ
देशमुख आणि राऊत यांच्या भेटीसह यापूर्वी झालेल्या गुप्त गाठीभेटींमुळे महाविकास आघाडीत संशयकल्लोळ निर्माण झालाय. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट
शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार काल मुंबईत भेटल्याचं उघड झालं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचंही समोर आलं होतं. त्या वृत्ताचं आशिष शेलार यांनी इन्कार केला. आज राऊत यांनीही त्याचा इन्कार केला. अफवा पसरवल्या जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, देशमुख आणि राऊत यांच्या भेटीसह यापूर्वी झालेल्या गुप्त गाठीभेटींमुळे महाविकास आघाडीत संशयकल्लोळ निर्माण झालाय. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट
