Special Report | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात गोपीचंद पडळकर पुन्हा येणार?

| Updated on: Dec 11, 2021 | 11:50 PM

सोमवारपर्यंत कामावर या, नाही तर मंगळवारपासून मेस्माची कारवाई सुरू होईल, असा शब्दात शेवटचं अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलं आणि इकडे 17 दिवसांआधी आझाद मैदानात संपाचं नेतृत्व करणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी परबांवर हल्लाबोल केला. परबांची मेस्मा लावण्याची भाषा मुघलशाही असल्याचा घणाघात परबांनी केलाय.

Follow us on

एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा निघण्यापेक्षा तो अधिक चिघळण्याची शकत्या पाहायला मिळत आहे.  सोमवारपर्यंत कामावर या, नाही तर मंगळवारपासून मेस्माची कारवाई सुरू होईल, असा शब्दात शेवटचं अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलं आणि इकडे 17 दिवसांआधी आझाद मैदानात संपाचं नेतृत्व करणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी परबांवर हल्लाबोल केला. परबांची मेस्मा लावण्याची भाषा मुघलशाही असल्याचा घणाघात परबांनी केलाय.

आठवड्यांआधी, पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी आझाद मैदानातल्या संपातून माघार घेतली. पगारवाढ मान्य करत, त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांनाही एक पाऊल मागे घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून पडळकर आणि खोतांनी एसटीच्या संपावरून भाष्य करणं टाळलं. मात्र आता पडळकरांच्या निशाण्यावर परब आलेत. ज्या प्रमाणं गिरणी कामगारांचा संप चिघळवला. त्याचप्रमाणं एसटीचा संप चिघळवून, महामंडळाच्या जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा आरोप पडळकरांनी केलाय.