Special Report | Raj Thackeray यांच्याविरोधात सरकार कारवाईच्या तयारीत? -tv9

Special Report | Raj Thackeray यांच्याविरोधात सरकार कारवाईच्या तयारीत? -tv9

| Updated on: May 02, 2022 | 9:39 PM

अटींचं उल्लंघन झाल्यामुळे आता पोलीस दल कारवाईच्या तयारीत आहे. राज ठाकरे बोलत असताना बाजूच्या मशिदीवरुन अजान सुरु झाली...आणि त्यावेळी राज ठाकरेंनी केलेलं विधान प्रक्षोभक आणि तेढ निर्माण करणारं असल्याचा दावा पोलिसांचा आहे.

नियमांचं उल्लंघन आणि प्रक्षोभक विधानांवरुन राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.राज ठाकरेंवर प्रक्षोभक विधानं, वैयक्तिक टीका आणि गर्दीची अट मोडल्याचा आरोप केला जातोय, 15  रांपेक्षा जास्त गर्दी नको, भाषणात वैयक्तिक टीका आणि चिथावणी नको., या अटींनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात आली. त्या अटी पाळण्याचं मनसे नेत्यांनी मान्यही केलं. पण त्या अटींचं उल्लंघन झाल्यामुळे आता पोलीस दल कारवाईच्या तयारीत आहे. राज ठाकरे बोलत असताना बाजूच्या मशिदीवरुन अजान सुरु झाली…आणि त्यावेळी राज ठाकरेंनी केलेलं विधान प्रक्षोभक आणि तेढ निर्माण करणारं असल्याचा दावा पोलिसांचा आहे. याआधी अनेकदा सभांच्या दरम्यान अजान वाजल्याच्या घटना घडल्यायत. त्यावेळी मोदींपासून अनेक नेत्यांनी भाषणं काही काळ थांबवल्याचीही उदाहरणं आहेत. पण काल राज ठाकरेंच्या भाषणावेळी अजान वाजली., आणि राज ठाकरेंनी त्यावेळी पोलिसांना ती अजान बंद करण्याचा इशारा दिला.