Special Report | जगात पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाचा शंखनाद ?

Special Report | जगात पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाचा शंखनाद ?

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 9:39 PM

रशियानं यूक्रेनवर हवाई हल्ले केले असून बॅलेस्टिक मिसाईडल डागल्या आहेत. तर, लोक वास्तव्याला असलेल्या भागात हल्ले करत नसल्याचं रशियाचं म्हणनं आहे. रशियानं पॅराशूटद्वारे सैन्य यूक्रेनमध्ये उतरवायला सुरुवात केलीय. यूक्रेनची राजधानी किव जवळ एक लढाऊ विमान क्रॅश झालं आहे. त्या विमानातून 14 जण प्रवास करत होते, अशी माहिती आहे.

रशियानं यूक्रेनवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत. रशियन फौजांनी यूक्रेनला चारी बाजूनं घेरलं आहे. रशियाचं सैन्य यूक्रेनची राजधानी किव जवळ पोहोचलं आहे. यूक्रेनच्या राजधानीपासून रशियाचं सैन्य 75 किमीवर पोहोचलंय. रशियानं यूक्रेनवर हवाई हल्ले केले असून बॅलेस्टिक मिसाईडल डागल्या आहेत. तर, लोक वास्तव्याला असलेल्या भागात हल्ले करत नसल्याचं रशियाचं म्हणनं आहे. रशियानं पॅराशूटद्वारे सैन्य यूक्रेनमध्ये उतरवायला सुरुवात केलीय. यूक्रेनची राजधानी किव जवळ एक लढाऊ विमान क्रॅश झालं आहे. त्या विमानातून 14 जण प्रवास करत होते, अशी माहिती आहे. रशियाच्या आक्रमणानंतर यूक्रेनच्या राष्ट्रपतींकडून मार्शल लॉ लागू केला आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत यूक्रेनचे 300 लोक मारले गेले आहेत.