Mumbai Local Train : लोकलच्या दारातच तुम्ही बॅग घेऊन लटकताय? तर हे वाचाच, कारण आता पीक अवर्सला…

Mumbai Local Train : लोकलच्या दारातच तुम्ही बॅग घेऊन लटकताय? तर हे वाचाच, कारण आता पीक अवर्सला…

| Updated on: Jun 19, 2025 | 1:03 PM

सकाळी आणि सायंकाळच्या ‘पीक अवर्स'ला प्रमुख आणि गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. लोकल ट्रेनना ‘पीक अवसला मोठी गर्दी होते. पुन्हा कोणताही अपघात होऊन नये म्हणून लोकलच्या दारात बॅगा घेऊन उभं राहण्यास मनाई असणार आहे.

लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ‘अॅक्शन मोड’वर आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकलच्या ट्रेनच्या दरवाज्यात बँग घेऊन उभं राहण्यास मनाई असणार आहे. पीक अवर्सला रेल्वे स्थानकावर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस, जवान तैनात असणार आहेत. बॅगधारक प्रवाशांनी रेल्वेच्या दरवाज्यावर उभे राहू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मुंब्र्यात चार प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर अपघात रोखण्यासाठी आता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बऱ्याचदा लोकलमध्ये आत शिरता येत नसल्याने किंवा जवळच्या स्टेशनवर उतरायचे असल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाज्यावर लटकतात. त्यांच्या बॅगा एकमेकांमध्ये अडकून प्रवासी खाली पडण्याचा धोका अधिक असतो. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाबरोबर आरपीएफ आणि जीआरपीने लोकल ट्रेनच्या गेटवरील गर्दी नियंत्रणासाठी अधिक सतर्कता बाळगली आहे.

Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

Published on: Jun 19, 2025 01:03 PM