Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर मुनगंटीवारांना संधी, मंत्री होणार की विधानसभाध्यक्ष? चर्चांना उधाण
सुधीर मुनगंटीवार यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे, असं सामनातून दावा करण्यात आलाय. राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार असं दावा सुद्धा सामनामधून करण्यात आलाय. दरम्यान पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
मंत्रीपदी संधी न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. सुधीर मुनगंटीवार यांना योग्य वेळी योग्य संधी देऊ, असं फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं. आमच्या मानसपटलावर सुधीर भाऊंची जी काही जागा आहे ती फार वरची आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलंय. या वक्तव्यादरम्यान, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फडणवीसांना उद्देशून खोचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री महोदय फार वरची जागा द्यायचा विचार करू नका. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी स्पष्टपणे म्हटलं की, अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही.
मंत्रीमंडळात फेरबदल झाल्यास सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळेल का अशी चर्चा सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्ष करणार की मंत्री करणार असा सवाल आहे. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष केल्यास विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार का? असाही सवाल आहे.
