Rohit Pawar Tweet | सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट; दोन नेत्यांवर साधला निशाणा

Rohit Pawar Tweet | सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट; दोन नेत्यांवर साधला निशाणा

| Updated on: Feb 10, 2026 | 1:28 PM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या पदावर कामकाज सुरू होताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळाली आहे, तर विरोधकांकडूनही या निर्णयावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीयध्यक्ष पदीही लवकर विराजमान व्हावं असं ट्विट करत शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या पदावर कामकाज सुरू होताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळाली आहे, तर विरोधकांकडूनही या निर्णयावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीयध्यक्ष पदीही लवकर विराजमान व्हावं असं ट्विट करत शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेत, काही लोक सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा विरोध करत असले तरी लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात थेट नाव न घेता प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पक्षाच्या भवितव्याचा विचार करूनच कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान देणे आवश्यक आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे, तसेच पक्षाच्या आंतरिक समीकरणांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Published on: Feb 10, 2026 01:28 PM