सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही, मात्र…

| Updated on: May 11, 2026 | 3:51 PM

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी रोहा शहरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यानंतर सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोहा शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच रायगड दौरा ठरला. यावेळी अनिकेत तटकरे, अदिती तटकरे यांसह अनेक नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे अनिकेत तटकरेंनी यंदाही सुनेत्रा पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं.

कार्यक्रमावेळी मंत्री अदिती तटकरे या भावूक झाल्या. अजित पवार जिथेही असतील, त्यांचे लक्ष कायम बारामतीकडेच असेल, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अदिती तटकरे या माझ्या मुलीसारख्याच आहेत, असे सांगत रायगडच्या विकासासाठी कायम लक्ष देण्याचे आश्वासन दिले. तसेच अजित दादांची उणीव भरून निघणार नाही, मात्र मी शब्द देते माझं रायगडवर नेहमी लक्ष राहील. असेही त्यांनी नमूद केले.

Published on: May 11, 2026 03:51 PM
Follow Us